कोविडःआरटीपीसीआरमध्ये 163 पॉझिटिव्ह तर 48 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 33 पॉझिटीव्ह


अकोला दि.12(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 671 अहवाल प्राप्त झाले. त्यात 154 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून नऊ असे एकूण 163 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.11) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 33 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58715(43920+14522+273) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 154 व खाजगी 9) 163 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 33 = एकूण पॉझिटीव्ह 196.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 349457 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 345588 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3467 नमुने होते. आजपर्यंत एकूण 349457 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 305537 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 163 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 154 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 118 महिला व 36 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 116 जण हे अकोला हरातील, अकोट तालुक्यातील 13 जण, मुर्तिजापूर येथील 11, अकोला ग्रामीण येथील सात, बार्शीटाकळी येथील चार, बाळापूर येथील तीन रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 163 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

48 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 48 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

735 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 58715(43920+14522+273) आहे. त्यात 1143 मृत झाले आहेत. तर 56837 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 735 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 515 चाचण्यात 33 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.11) दिवसभरात झालेल्या 515 चाचण्या झाल्या त्यात 33 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात  बार्शीटाकळी येथे  चार, बाळापूर येथे दोन, मुर्तिजापूर येथे 14, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 182 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामिण येथे 199 चाचण्यात सात, अकोट येथे 15 चाचण्यात पाच, आरोग्य कर्मचारी 30 चाचण्यात एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35 चाचण्यात चार व हेडगेवार लॅब येथे 34 चाचण्यात 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, से एकूण 515 चाचण्यात 33 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ