मराठी भाषा समितीःअशासकीय सदस्यांची नेमणूक; प्रस्ताव मागविले

 अकोला,दि.७(जिमाका)- महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६६ नुसार मंत्रालयीन विभागीय व राज्य शासनाच्या सर्व कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक  असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा समिती स्थापन करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने गठीत करावयाच्या समितीमध्ये अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची असून इच्छुक पात्र व्यक्तिंकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा मराठी भाषा अधिकारी  सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

अशासकीय सदस्यांसाठी पात्रता याप्रमाणे-

१. मराठी भाषा, कला, प्रयोगनिष्ठ कला, साहित्य, संस्कृती किंवा प्रकाशने या क्षेत्रातील जिल्ह्यात राहण्याऱ्या व्यक्तीमधून जिल्हाधिकाऱ्यांनी नामनिर्देशित करावयाचे दोन प्रतिनिधी.

२. मराठी भाषा कला, प्रयोगनिष्ठ कला,  साहित्य, संस्कृती, प्रकाशने किंवा ग्रंथालये या क्षेत्रातील जिल्ह्यात काम करणाऱ्या अशासकीय संस्था, संघटना चळवळी किंवा मंच यातील जिल्हाधिकाऱ्यांने नामनिर्देशित करावयाचे दोन प्रतिनिधी.

याप्रमाणे पात्रता असलेल्या इच्छुक नागरिकांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय, सर्वसाधारण शाखा येथे दि.११ पर्यंत सादर करावे. नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्विकारण्यात येणार नाही याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अकोला यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ