मागणीनुसार खाजगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 




अकोला दि.३१(जिमाका)-  वय वर्षे १५ ते १७ वयोगटातील मुला मुलींचे लसीकरण सुरु आहे. लसीकरण वाढविण्यासाठी खाजगी शिकवणी देणाऱ्या संस्थानी मागणी केल्यास त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबीर आयोजित करुन  लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवानात खाजगी शिकवणी वर्ग चालकांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शिक्षणाधिकारी डॉ. सुचित्रा पाटेकर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. अनुप चौधरी, डॉ. मनिष शर्मा तसेच खाजगी शिकवणी वर्ग चालक व  संस्था प्रमुख उपस्थित होते.

यावेळी निर्देश देण्यात आले की, शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणी देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करुन लसीकरण करण्याबाबत प्रोत्साहित करावे. १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थी लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, याकरीता खाजगी शिकवणी वर्ग चालकांनी दक्षता घ्यावी. लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच ऑफलाईन वर्गात प्रवेश द्यावा. तसेच कोविड प्रतिबंधात्मक नियमाचे पालन करुन शिकवणी वर्ग चालवावे. नियमाचे उल्लंघन झाल्यास संस्थेवर कार्यवाही करण्यात येईल. याकरीता प्रशासनाव्दारे फिरते पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे,असेही यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ