कोविडः आरटीपीसीआर १० तर रॅपिड ॲन्टीजेन 'एक'पॉझिटीव्ह

 अकोला दि.(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 दरम्यान काल (दि.२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७९२८(४३३०७+१४४३८+१८३)  झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर दहा + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह अकरा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३४४८६७ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३४१२११ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२५४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३४४८६७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३०१५६० आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

१० पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार तर खाजगी लॅबच्या अहवालात सहा जणांचा असा दहा जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. हे सर्व रुग्ण हे मनपा हद्दीतील रहिवासी आहेत.

२४ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७९२८(४३३०७+१४४३८+१८३)  आहे. त्यात ११४२ मृत झाले आहेत. तर ५६७६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः१३३चाचण्यात एकपॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.२) दिवसभरात झालेल्या १३३ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

      काल दिवसभरात  तेल्हारा येथे २२, अकोला महानगरपालिका क्षेत्रात ७५, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३०, हेडगेवार लॅब येथे सहा अशा एकूण १३३ चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ