जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश;रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी

 अकोला, दि.९(जिमाका)- संपूर्ण अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता आज (दि.९) चे रात्री १२ वाजेपासून पुढील आदेशापर्यंत  रात्रीची संचारबंदी तसेच दिवसा जमावबंदीच्या आदेशासह इतर निर्बंध जारी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले.

बाबनिहाय निर्बंध याप्रमाणे-

अ.क्र.

बाब

निर्बंध

व्‍यक्‍तींच्‍या हालचालींवर निर्बंध

१.      सकाळी ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा अधिक व्‍यक्‍तींना एकत्र येता येणार नाही

२.     रात्री  ११ ते सकाळी  वाजेपर्यंत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस अत्‍यावश्‍यक किंवा  वैद्यकी कारणाशिवाय घराबाहेर पडण्‍यास पूर्णतः बंदी राहील.

शासकीय कार्यालये

१.      अभ्‍यागतांना कार्यालय प्रमुखांच्या स्पष्ट आणि

लेखी परवानगीशिवाय  प्रवेश राहणार नाही.

२.      कार्यालयप्रमुखांद्वारे नागरीकांसोबत  व्‍हीडीओ कॉन्‍फरन्सिंग द्वारे ऑनलाइन संवाद साधण्‍यात येईल.

३.      स्‍थानिक अथवा बाहेरुन येणाऱ्या अभ्‍यागतांसोबत  व्हिडीओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे सभेचे आयोजन करण्‍यात येईल. 

४.    कार्यालयप्रमुख यांनी आवश्‍यकतेनुसार कर्मचारी यांचे कामाचे तास ठरवून कामाचे  नियोजन करावे.  तसेच शक्‍य असल्‍यास  Work From Home ला प्राधान्‍य देण्‍यात यावे.

५.     कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

६.     कार्यालय व्‍यवस्‍थापनाने कार्यालयामध्‍ये थर्मल स्कॅनर, हँड सॅनिटायझर इ. ची व्‍यवस्‍था करावी.

खाजगी कार्यालये

१.      व्‍यवस्‍थापनाने कर्मचारी यांच्‍या कामाचे तास निश्चित करुन शक्‍यतोवर Work from Home चे माध्‍यमातून कामे करावी. 

२.      व्‍यवस्‍थापनाने नियमित उपस्थितीच्या ५० % पेक्षा जास्त कर्मचारी संख्‍या उपस्थित राहणार नाही याची दक्षता घ्‍यावी.

३.      ज्‍या आस्‍थापना  २४ तास सुरु राहतात अशा ठिकाणी शिफ्ट नुसार कामे निश्चित करण्‍यात यावी.

४.    कर्मचाऱ्यांना अत्‍यावश्‍यक कामासाठी प्रवास करतेवेळी कार्यालयाचे  ओळखपत्र निर्गमित करण्‍यात यावे. तसेच ते सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

५.     लसीकरणाच्‍या दोन्‍ही मात्रा घेतलेल्‍या कर्मचाऱ्यानां कार्यालयामध्‍ये प्रवेश राहील.  तसेच  ज्‍यांनी लसीकरण केले नाही त्‍यांना लसीकरण करुन घेणे बाबत प्रोत्‍साहीत करण्‍यात यावे.

६.      कार्यालयामध्‍ये कोविड अनुरूप  वर्तनाचे  तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.

७.    व्‍यवस्‍थापनाने कामाचे तास ठरवितांना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सुविधा विचारात घ्‍यावी. 

विवाह समारंभ

जास्‍तीत जास्‍त ५० व्‍यक्‍ती

अंत्‍यविधी

जास्‍तीत  जास्‍त  २० व्‍यक्‍ती

सामाजिक / धार्मिक / सांस्‍कृतिक   / राजकीय कार्यक्रम

जास्‍तीत जास्‍त ५०  व्‍यक्‍ती

शाळा आणि महाविद्यालये,

कोचिंग क्‍लासेस

दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद राहतील.

केवळ खाली बाबींना मुभा राहील.

१.      इयत्‍ता १० वी १२ वी करिता विविध शैक्षणिक मंडळांनी निश्‍चीत केलेले उपक्रम.

२.      प्रशासकीय उपक्रम आणि वर्गातील शिकवण्यांव्यतिरिक्त  शिक्षकांनी  हाती घेतलेले उपक्रम.

३.      विशेषत: शालेय शिक्षण विभागाद्वारे निर्देशित किंवा परवानगी असलेले उपक्रम. कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला आणि बाल विकास विभाग किंवा कोणतेही वैधानिक प्राधिकरण.

४.    इतर अत्‍यावश्‍यक उपक्रमाकरिता SDMA राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांचेकडून मान्यता घ्यावी लागेल.

स्विमिंग पूल , जिम, स्‍पा,  वेलनेस सेंटर आणि ब्युटी पार्लर

पूर्णतः बंद

हेअर कटींग सलून

१.      ५० % क्षमतेसह सुरु राहतील.

२.      दररोज रात्री १० ते सकाळी पर्यंत बंद राहतील.

३.      हेअर कटींग सलून मधील इतर उपक्रम असल्‍यास ते पूर्णतः बंद राहतील.

४.    कोविड अनुरूप  वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील.

५.    काम करणाऱ्या व्‍यक्तिने  लसीकरणाच्या दोन्‍ही मात्रा घेतल्‍याचे बंधनकारक राहील.

१०

क्रीडा स्पर्धात्मक कार्यक्रम

 

केवळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पूर्वी   निश्चित करण्‍यात आलेल्‍या स्पर्धा खालील बंधनासह घेता येतील. 

१.      प्रेक्षक नसावेत.

२.      सर्व खेळाडू आणि आयोजकांनी बायो-बबल शेड्यु करावे.

३.      राष्‍ट्रीय आणि आंतरराष्‍ट्रीय खेळाकरिता भारत सरकारने निश्चित केलेले सर्व नियम  लागू राहतील.

४.    दर तिन दिवसांनी प्रत्‍येक खेळाडू तसेच व्‍यवस्‍थापनाने RTPCT /RAT करणे बंधनकारक राहील.

५.     जिल्‍हास्‍तरीय कोणत्‍याही स्‍पर्धा आयोजित करता येणार नाही.

११

मनोरंजन उद्याने, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये, किल्ले आणि सामान्य लोकांसाठी इतर तिकीट असलेली  ठिकाणे/ स्थानिक पर्यटन /खेळ

पूर्णतः बंद

१२

शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स निर्बंधासह सुरु राहतील.

 

१.      ५०%  क्षमतेने सुरु ठेवता येईल.  पूर्ण क्षमता   ५०%  क्षमता या बाबतचे माहितीचे फलक दर्शनि भागात लावणे आवश्‍यक राहील.

२.      फक्त लसीकरणाच्‍या दोन्‍ही मात्रा घेतलेल्‍या व्यक्तींनाच परवानगी राहील

३.      रात्री १० ते सकाळी  पर्यंत बंद राहतील.

४.    सर्व दिवशी होम डिलिव्हरीला परवानगी राहील.

१३

रेस्‍टारेंट / कॅटरींग

१.      ५०%  क्षमतेने सुरु ठेवता येईल.  पूर्ण क्षमता   ५०%  क्षमता या बाबतचे माहितीचे फलक दर्शनि भागात लावणे आवश्‍यक राहील.

२.      फक्त लसीकरणाच्‍या दोन्‍ही मात्रा घेतलेल्‍या व्यक्तींनाच परवानगी राहील

३.      रात्री  १०ते सकाळी  पर्यंत बंद राहतील.

४.    सर्व दिवशी होम डिलिव्हरीला परवानगी राहील.

१४

नाट्यगृह / सिनेमा थियेटर

१.      ५०% क्षमतेने सुरु ठेवता येईल.  

२.      पूर्ण क्षमतेची माहिती तसेच सध्याच्या प्रेक्षकांची संख्या आस्थापनाबाहेरील सूचना फलकावर प्रदर्शित करणे आवश्यक राहील.

३.       केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी राहील.

४.    सर्व दिवस रात्री १० ते सकाळी पर्यंत बंद राहील.

१५

आंतरराष्‍ट्रीय प्रवास

भारत सरकारच्‍या मार्गदर्शक सुचनेनुसार.

१६

स्थानिक प्रवास

 

हवाई मार्गाने , रेल्‍वेने, रस्‍त्‍याने प्रवास करणाऱ्या व्‍यक्‍तींना  लसीकरणाच्‍या दोन्‍ही मात्रा पूर्ण झालेल्‍या तसेच  RTPCR Test चाचणी अहवाल निगेटीव्‍ह असल्‍याचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील.  (सदर प्रमाणपत्र  ७२ तासाच्‍या कालावधीकरिता  वैध राहील.)  उक्‍त बाबी ह्या ड्रायव्‍हर, क्लिनर तसेच  प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू राहतील.

१७

कार्गो वाहतूक , औद्योगि उपक्रम, बांधकाम उपक्रम

पूर्ण लसीकरण झालेल्या व्‍यक्‍तींद्वारे सुरु ठेवता येईल.  

 

१८

सार्वजनिक वाहतूक

नियमित वेळेनूसार पूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशीसह  सुरु ठेवता येईल.  

 

१९

UPSC/MPSC, वैधानिक प्रधिकरण , सार्वजनिक संस्‍थेद्वारे आयोजित रीक्षा

१.      राष्‍ट्रीय स्‍तरावर होणाऱ्या सर्व स्‍पर्धात्‍मक रीक्षा भारत सरकार यांचे मार्गदर्शक सूचनेनुसार घेता येतील.

२.      रीक्षेकरिता उपस्थित राहण्‍याकरिता हॉल टिकीट तसेच  इतर आवश्‍यक दस्‍तऐवज सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

३.      राज्‍यस्‍तरावरील आयोजीत सर्व स्‍पर्धात्‍मक परिक्षा जेथे हॉल टिकीट पूर्वीच निर्गमित केले आहे.  आणि रीक्षेच्‍या तारखा आधिच निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत.

४.    इतर रीक्षेकरीता राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण यांची मंजूरी अत्‍यावश्‍यक राहील.

५.    रीक्षेदरम्‍यान कोविड अनूरूप  वर्तनाचे पालन करणे बंधनकारक राहील.

 

१.      विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानकांकडे किंवा तेथून २४ तास सुरू असलेल्या प्रवासासाठी  वैध टिकीट सोबत बाळगणे बंधनकारक राहील.

२.      दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा ई-कॉमर्समध्ये गुंतलेल्या कोणत्याही आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना पूर्ण लसीकरण करणे आवश्यक राहील.  उल्‍लंघन करणाऱ्या व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल आणि या आवश्यकतेचे उल्लंघन करणारे कोणतेही प्रकरण आढळल्यास, संबंधि  आस्थापना नियमानूसार  बंद केली जाईल

३.      सर्व सावर्जनिक ठिकाणी वावरतांना तसेच शासकीय कार्यालयामध्‍ये येणाऱ्या नागरीकांनी  मास्‍कचा वापर करणे अनिवार्य राहील.

४.    कोणत्‍याही परिस्‍थीतीत कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे तसेच  कोविड अनुरुप वर्तनाचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्‍यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला संबंधि आस्‍थापना यांनी तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक राहील. निर्बंधाचे  उल्‍लंघन करणाऱ्यावर  तसेच  संबंधि आस्‍थापनेवर दंडनीय कारवाई  संबंधि प्राधिकारी यांचेकडून करण्‍यात  येईल.

५.     कोविड संदर्भाने  दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजी निर्गमित केलेल्‍या आदेशातील निर्बंध कायम राहतील.

६.     कोविड नियमांचे  उलंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर/आस्‍थापनेवर दंडात्‍मक कारवाई  करण्‍याबाबतचे दंड आकरण्याचे आदेश यापुढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी  अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधीत  अनुज्ञप्‍ती प्राधिकारी,  आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस धीक्षक अकोला , महसूल विभाग तसेच  ग्रामिण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगरपालिका/नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ