राष्ट्रीय मतदार दिवस मतदार जागरुक तर लोकशाही सुदृढ- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 






अकोला,दि.२५(जिमाका)- मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याबाबत मतदारांनी नेहमी जागरुक असले पाहिजे. मतदार जागरुक तर लोकशाही सदृढ असते. मतदार यादीत नाव समावेश  झाल्याची खातरजमा करावी. जेणे करुन मतदानापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी निवडणूक विभागासह सर्वांनी अधिक दक्षतेने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निमा अरोरा या होत्या. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले,  सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नवमतदार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नवमतदार व अन्य मतदारांना मतदाना हक्क मिळावा याकरीता निवडणूक विभागाव्दारे मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आले. या मोहिमेतून जिल्ह्यात मतदारांची संख्या १५ लक्ष ४७ हजार ४०६ झाली असून त्यात ३४ हजार ९० मतदारांची वाढ झाली आहे. तसेच नव्याने समाविष्ट तरुण मतदारांची संख्या १३ हजार ८८९ आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांनी मतदान करण्याबाबतची सामुहिक  प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप जिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ