कोविडःआरटीपीसीआरमध्ये 112 पॉझिटिव्ह, 58 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 11 पॉझिटीव्ह

अकोला दि.17(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 301 अहवाल प्राप्त झाले. त्यात 99 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 13 असे एकूण 112 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59919(44842+14660+417) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 99 व खाजगी 13) 112 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 11 = एकूण पॉझिटीव्ह 123.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 352173 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 348247 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3524 नमुने होते. आजपर्यंत एकूण 352173 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 307331 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 112 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 99 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 27 महिला व 72 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 93 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील चार, मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 112 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

58 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 58 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1597 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59919(44842+14660+417) आहे. त्यात 1145 मृत झाले आहेत. तर 57177 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1597 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 132 चाचण्यात 11 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.16) दिवसभरात झालेल्या 132 चाचण्या झाल्या त्यात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण व अकोट येथे प्रत्येकी दोन,  बार्शीटाकळी व मुर्तिजापूर येथे प्रत्येकी एक, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 57 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 38 चाचण्यात चार, हेडगेवार लॅब येथे 31 चाचण्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 132 चाचण्यात 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ