जिल्ह्यातील कलावंताना आर्थिक मदत; 25 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


अकोला दि.14 (जिमाका)- कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे संचारबंदीच्या कालावधीत कलाकारांना उत्पन्नापासुन वंचित राहावे लागले. कलावंताना आर्थिक मदत व्हावी याकरीता शासनाव्दारे आर्थिक पॅकेज जाहिर केले आहे. या आर्थिक मदतीचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील कलाकार लाभार्थ्यांनी परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रासह मंगळवार दि. 25 जानेवारीपर्यंत करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

कोविड प्रार्दुभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन, सादरीकरण व त्‍यातुन येणाया उत्‍पन्‍नापासुन कलावंताना वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजीत करण्‍यात  येणारे कार्यक्रमही या काळात स्‍थगित करण्‍यात आले. त्यामुळे उपजिविकेचे साधन सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर असल्याने कलावंताना आर्थिक अडचणीना सामोर जावे लागले. कलावंताना आर्थिक दिलासा पॅकेज देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला असून राज्‍यातील कलावंतासाठी  ३५ कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली आहे.  प्रतिकलाकार पाच हजार रुपये एकरकमी अनुदान देण्‍यात येणार आहे. याकरीता कलावंतानी समाज  कल्‍याण विभागाकडे अर्ज करावा. योजनेचा विहित नमुन्‍यातील अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्‍याण विभाग येथे तसेच संकेतस्‍थळावर aKolazp.gov.in वर उपलब्‍ध आहे. तरी जिल्ह्यातील कलाकार लाभार्थ्यांनी  आपला अर्ज मंगळवार दि. 25 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, अकोला येथे आवश्यक कागदपत्रासह करावा.   

पात्रता व निकष - प्रयोगात्‍मक कलेतील केवळ कलेवर उपजीविका असणारे आर्थीक दृष्टया दुर्बल कलाकार यासाठी पात्र राहतील, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्‍तव्‍य असावे, कलेच्‍या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत, वार्षिक उत्‍पन्‍न 48 हजार रूपयांच्‍या कमाल मर्यादित असणे आवश्‍यक आहे. (तहसीलदार यांचे उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र)  केंद्र शासन व राज्‍य शासनाच्‍या जेष्‍ठ कलाकार मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना इतर वैयक्तिक शासकीय अर्थसाहाय्यच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ