‘सुकन्या समृद्ध योजना’; डाक विभागाव्दारे विशेष मोहिम

 अकोला दि.19(जिमाका)- भारतीय डाक विभागाव्दारे  जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 10 वर्ष वयाच्या आतील मुलीकरीता ‘सुकन्या समृद्धी योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व्हावा याकरीता 31 जानेवारीपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहायक डाक अधिक्षक यांनी केले आहे.

सुकन्या समृद्धी योजना  ही लहान बचत योजनांची विस्‍तृत श्रेणीची भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. ही योजना केवळ मुलीसाठी असून बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा एक भाग आहे. मुलीच्‍या शिक्षणाचा आणि लग्‍नाचा खर्च भागवता यावा याकरीता ही योजना आहे. 10 वर्षा खालील  मुलींसाठी किमान दोनशे पन्नास रुपये भरुन खाते उघडता येते.  तरी लाभार्थ्यांनी जवळच्‍या पोस्‍ट ऑफिसमध्‍ये एसएसवायमध्ये खाते उघडावे. एसएसवाय खाते उघडल्‍यानंतर लाभार्थी आयपीपीबी खात्‍यामार्फत आपले पुढील भरणा ऑनलाइन पद्धतीने करता येईल. जिल्हयातील नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ