कोविडःआरटीपीसीआरमध्ये 208 पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू, 122 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन सात पॉझिटीव्ह


अकोला दि.24(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 299 अहवाल प्राप्त झाले. त्यात 101 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 107 असे एकूण 208 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दोघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 62546(47004+14823+719) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 101 व खाजगी 107) 208 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सात = एकूण पॉझिटीव्ह 215.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 357156 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 353127 फेरतपासणीचे 407 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3622 नमुने होते. आजपर्यंत एकूण 357156 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 310152  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 208 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 101 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 33 महिला व 68 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 87 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील चार, मुर्तिजापूर येथील एक,  पातूर येथील तीन, बाळापूर येथील चार, अकोट येथील दोन जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 107 अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 208 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

122 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

2595 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 62546(47004+14823+719) आहे. त्यात 1150 मृत झाले आहेत. तर 58801 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 2595 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 177 चाचण्यात सात पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात झालेल्या 177 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे एक, अकोट येथे दोन, बाळापूर येथे तीन, बार्शीटाकळी येथे एक, पातूर येथे एक, तेल्हारा येथे सात, मुर्तिजापूर येथे एक, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 115 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 34 चाचण्यात चार, हेडगेवार लॅब येथे 12 चाचण्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 177 चाचण्यात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ