12 व 13 रोजी राष्ट्रीय युवा महोत्सव; ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्याचे आवाहन

अकोला, दि.11(जिमाका)- कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन बुधवार व गुरुवार दि. 12 व 13 जानेवारी रोजी पॉडिचेरी येथे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या महोत्सवामध्ये जिल्हयातील युवानी जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन पद्धतीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

  राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये राज्यातील लोकनृत्य व लोकगीत या दोन स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. या महोत्सवाचा लाभ  जिल्ह्यातील युवांना व्हावा याकरीता सर्व युवा स्वयंसेवक, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तसेच  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा व महाविद्यालय यांनी आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना https://nyf2022.org या संकेतस्थळावर आपली नोंदणी करुन राष्ट्रीय युवामहोत्सव ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. नोंदणी झालेल्या युवा स्वयंसेवक, युवा पुरस्कारार्थी, शालेय विद्यार्थ्यांनी त्याबाबतचा अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या akoladso@gmail.com इेमेल आयडीवर पाठवावा.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ