कोविडःआरटीपीसीआरमध्ये 185 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 428 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन सात पॉझिटीव्ह

 

अकोला दि.29(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 578 अहवाल प्राप्त झाले. त्यात 177 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 8 असे एकूण 185 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 428 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तसेच एकाचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.28) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 63849(48176+14879+794) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 177 व खाजगी 8) 185 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 7 = एकूण पॉझिटीव्ह 192.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 360465 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 356398 फेरतपासणीचे 410 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3657 नमुने होते. आजपर्यंत एकूण 360465 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 312289 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 185 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 177 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 83 महिला व 94 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 77 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील आठ, पातूर येथील 17, बाळापूर येथील चार, बार्शीटाकळी येथील एक, तेल्हारा येथील 15, अकोट येथील तीन, मुर्तिजापूर येथील 52 रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात आठ अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 185 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

428 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 428 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यूची नोंद झाली. त्यात शिवसेना वसाहत, अकोला येथील 59 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 22 जानेवारी रोजी दाखल केले होते.  त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1844 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 63849(48176+14879+794) आहे. त्यात 1152 मृत झाले आहेत. तर 60853 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1844 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 206 चाचण्यात सात पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.28) दिवसभरात झालेल्या 206 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात अकोला ग्रामीण येथे तीन,  अकोट येथे दोन, बाळापूर येथे पाच, बार्शीटाकळी येथे दोन, पातूर येथे दोन, तेल्हारा येथे पाच,  अकोला महानगर पालिका क्षेत्रात 125, जिल्हा आरोग्य कर्मचारी येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर मुर्तिजापूर येथे नऊ चाचण्यात चार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 40 चाचण्यात एक, हेडगेवार लॅब येथे 11 चाचण्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 206 चाचण्यासात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ