कोविड लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य; ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण; कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही अर्थसहाय्य वितरण

 



अकोला दि.12 (जिमाका)- कोविड लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 24 ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोविड लसीकरणामध्ये 90 टक्केपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील 286 ग्रामपंचायतीमधून लकी ड्राव्दारे जिल्हास्तरावरुन तीन ग्रामपंचायतीना तर सात तालुकास्तरावरुन प्रत्येकी तीन ग्रामपंचायतीना पारितोषिके देण्यात आले. तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे धनादेशही वितरीत करण्यात आले.

यासंदर्भातील पुरस्कार वितरण सोहळा आज जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात पार पडला. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड,  जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी,  माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सह्याद्री फाऊंडेशनचे विजय क्षिरसागर आदी उपस्थित होते.

कोविड लसीकरण उत्तमरित्या राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 90 टक्केपेक्षा जास्त लसीकरण केलेल्या ग्रामपंचायतीना लकी ड्रापद्धतीने निवड करुन पारितोषिक वितरण करण्यात आले. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे धनादेश सह्याद्री फाऊंडेशनच्या सहयोगातून वितरीत करण्यात आले.

त्यात अकोला तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस मारोडी ग्रा.प.(100 टक्के), व्दितीय बक्षीस  सुकळी नंदापुर ग्रा.प.(97 टक्के), तृतीय बक्षीस गोणापुर ग्रा.प.(100 टक्के), अकोट तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस देवरी ग्रा.प.(121 टक्के), व्दितीय बक्षीस सावरगाव(127 टक्के), तृतीय बक्षीस दिनोरी ग्रा.प.(102 टक्के),  मुर्तिजापूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस राजुरा घाटे ग्रा.प.(134 टक्के), व्दितीय बक्षीस गोरेगाव ग्रा.प.(123 टक्के), तृतीय बक्षीस अनभोरा ग्रा.प.(136 टक्के).

तेल्हारा तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस रानेगाव ग्रा.प.(100 टक्के), व्दितीय बक्षीस सौदळा ग्रा.प.(94 टक्के), तृतीय बक्षीस चांगलवाडी ग्रा.प.(104 टक्के).

पातुर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस तांदळी बु. ग्रा.प.(97.79 टक्के), व्दितीय बक्षीस बेलुरा बु. ग्रा.प.(98.74 टक्के), तृतीय बक्षीस कार्ला ग्रा.प.(95.48 टक्के).

 बाळापुर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस झूरळ खु. ग्रा.प.(95 टक्के), व्दितीय बक्षीस उरळ ग्रा.प.(101 टक्के), तृतीय बक्षीस शेळद ग्रा.प.(118 टक्के).

बार्शीटाकळी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस उजळेश्वर ग्रा.प.(91 टक्के), व्दितीय बक्षीस जांभरुण ग्रा.प.(93 टक्के), तृतीय बक्षीस धाबा ग्रा.प.(100 टक्के)वितरीत करण्यात आले.

तर जिल्हास्तरावरुन प्रथम बक्षीस अकोला तालुक्यातील वाशिंबा ग्रामपंचायत, व्दितीय बक्षीतस मुर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायत(98 टक्के), तृतीय बक्षीस तेल्हारा तालुक्यातील दानापुर ग्रामपंचायत(104 टक्के) बक्षीस वितरीत करण्यात आले. तर कोविड लसीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या उर्वरित 262 ग्रामपंचायतीना प्रमाणपत्र देण्यात आले.

00000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ