तुरीची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी

 अकोला दि.(जिमाका)-  हंगाम २०२१-२२ मध्ये दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबई जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, अकोला अंतर्गत आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेंतर्गत भारतीय खाद्य निगम मार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी  सुरु झाली असून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पारस, पातुर, विवरा, थार या केंद्रावर ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता ऑनलाईन ७/१२उतारा (उताऱ्यात तुर पीक पेऱ्याची नोंद आवश्यक.), आधारकार्ड झेरॉक्स प्रत, आधारलिंक असलेल्या पासबुकची झेरॉक्स प्रत (स्पष्ट दिसणारी) ही कागद पत्रे आवश्यक आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा