पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावाचे ऑनलाईन आयोजन

            अकोला, दि.21(जिमाका)-  जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रशासकीय औद्योगिक प्रशि‍क्षण संस्‍था(मुलींची) अकोला यांच्या संयुक्‍त विद्यमाने सोमवार दि. 24 ते 31 जानेवारी  दरम्‍यान ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्‍याय रोजगार मेळावाचे आयोजन करण्‍यात आले. शैक्षणिक पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले आहे.

या मेळाव्यामध्‍ये आष्‍लेषा पावर कंट्रोल प्रा.लि. अकोला येथे 100 रिक्‍त पदाकरीता किमान एस.एच.सी. पास असावा, वैभव बायोटेक प्रा.लि. अकोट जि.अकोला येथे 25 रिक्‍त पदाकरीता किमान एच.एच.सी. पास असावा. तर परम स्किल प्रा.लि. औरंगाबाद येथे 300 रिक्‍त पदाकरीता किमान एच.एच.सी. पास असावा. अश्‍या  एकुण 425 पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविण्‍यात येत आहे. ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात बारावी, पदवीका, पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाईन अप्‍लॉय करुन या ऑनलाईन रोजगार मेळाव्‍यात सहभागी  होऊन संधीचा लाभ घ्‍यावा.

            कौशल्‍य विकास व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव  नोंदणी केलेल्‍या बारावी, पदवी, पदवीका पुरुष महिला  उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ज्‍या उमदेवारांनी अद्याप सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही. त्‍यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नोंदणी करुन ऑनलाईन अप्‍लॉय करावे. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांना कंपनी, उद्योजक, एच.आर.प्रतिनिधी यांचेकडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबविली जाणार. तरी पात्र उमेदवारांनी जास्तीत जास्त ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ