कोविडःआरटीपीसीआरमध्ये 360 पॉझिटिव्ह, 196 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 38 पॉझिटीव्ह


अकोला दि.19(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 680 अहवाल प्राप्त झाले. त्यात 343 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 17 असे एकूण 360 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 38 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 60684(45512+14729+443) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 343 व खाजगी 17) 360 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 38 = एकूण पॉझिटीव्ह 398.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 353625 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 349669 फेरतपासणीचे 407 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3569 नमुने होते. आजपर्यंत एकूण 353625 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 308113 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 360 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 360 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 137 महिला व 206 पुरुष रुग्ण आहेत.  त्यातील 230 जण हे अकोला हरातील, अकोला ग्रामीण येथील सहा, मुर्तिजापूर येथील 56, बार्शीटाकळी येथील चार, पातूर येथील पाच, बाळापूर येथील 19, तेल्हारा येथील पाच व अकोट येथील 18 जण रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 360 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

196 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1968 जणांवर उप चार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 60684(45512+14729+443) आहे. त्यात 1145 मृत झाले आहेत. तर 57571 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1968 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 501 चाचण्यात 38 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 501 चाचण्या झाल्या त्यात 38 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात बाळापूर येथे 24, बार्शीटाकळी येथे तीन, पातूर येथे तीन, तेल्हारा येथे पाच, अकोला महानगर पालिका क्षेत्रात 82 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोला ग्रामीण येथे 162 चाचण्यात  एक, अकोट येथे 67 चाचण्यात 20, मुर्तिजापूर येथे एक चाचण्यात एक, जिल्हा आरोग्य कर्मचारी 62 चाचण्यात सहा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 47 चाचण्यात तीन, हेडगेवार लॅब येथे 45 चाचण्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, से एकूण 501 चाचण्यात 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम