पालकमंत्र्यांनी केले कलागुणसंपन्न बालिकांचे कौतूक

 



अकोला,दि.26(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कलागुण संपन्न असलेल्या दोन बालिकांचे कौतूक करण्यात आले. त्यात वैभवी विलास गवई या दिव्यांग बालिकेने गायलेल्या  बेटी बचाओचा संदेश देणाऱ्या गिताच्या व्हिडीओचे विमोचन केले. तसेच पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवणारी पूर्वा प्रमोद बगळेकर या बालिकेचेही त्यांनी कौतूक केले. या वेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा