कोविडःआरटीपीसीआरमध्ये 234 पॉझिटिव्ह तर 67 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन 26 पॉझिटीव्ह


अकोला दि.14(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 501 अहवाल प्राप्त झाले. त्यात 207 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 27 असे एकूण 234 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59259(44351+14602+306) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 207 व खाजगी 27) 234 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 26 = एकूण पॉझिटीव्ह 260.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 350750 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 346847 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3501 नमुने होते. आजपर्यंत एकूण 350750 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 306399 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 

आरटीपीसीआर 234 पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 207 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात 80 महिला व 127 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 163 जण हे अकोला हरातील, अकोट तालुक्यातील सात, मुर्तिजापूर येथील 20, अकोला ग्रामीण येथील आठ, बार्शीटाकळी येथील पाच, बाळापूर येथील चार रहिवासी आहे. खाजगी लॅबच्या अहवालात 27 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असे एकूण 234 जणांचे  अहवाल पॉझिटिव्ह आले, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

67 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथून 67 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

1176 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 59259(44351+14602+306) आहे. त्यात 1143 मृत झाले आहेत. तर 56940 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1176 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 501 चाचण्यात 26 पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.13) दिवसभरात झालेल्या 501 चाचण्या झाल्या त्यात 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 काल दिवसभरात  अकोला ग्रामीण येथे 20, बार्शीटाकळी येथे पाच, बाळापूर येथे सहा, पातूर येथे दोन, आरोग्य कर्मचारी 30, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 37 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तर अकोट येथे 58 चाचण्यात सहा, मुर्तिजापूर येथे 12 चाचण्यात दोन, अकोला महानगरपालिका क्षेत्रात 294 चाचण्यात एक व हेडगेवार लॅब येथे 37 चाचण्यात 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, से एकूण 501 चाचण्यात 26 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ