रुग्णवाहीकांचे सुधारित भाडेदर




         अकोला,दि.30(जिमाका)- मा. उच्च न्यायालयाने रुग्णवाहीकांचे भाडेदर ठरविण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार अकोला जिल्ह्याकरीता सामान्य नागरिेकांच्या दृष्टीने तसेच  रुग्णवाहिकांच्या मालकाच्या दृष्टीने सोईचे व  हिताचे होईल त्याअनुषंगाने प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अकोला यांनी रुग्णवाहिकांच्या सुधारित भाडेदर दिले आहेत.
             मारुती व्हॅनचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर रु. 500/- प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका  क्षेत्र सोडून रु. 1000/- व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. रु.11/- प्रमाणे. टाटा सुमो व मॅटडोरचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर रु. 600/- प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका  क्षेत्र सोडून रु. 1400/- व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. रु.12/- प्रमाणे. टाटा 407 व स्वराज मझदाचे महानगरपालीका क्षेत्राचे रुगणवाहिकांचे भाडेदर रु. 700/- प्रती एक फेरी(25कि.मी.पर्यंत), महानगरपालिका  क्षेत्र सोडून रु. 1300/- व जिल्हाबाहेर प्रती कि.मी. रु.14/- प्रमाणे तर आय.सी.यु. अथवा वातानुकुलित वाहनात वातनुकूलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरात 15 टक्के वाढीव दराने राहील. तसेच रुग्णवाहिकेतुन जर कोविड रुग्ण वाहुन न्यावयाचा असल्यास या दराव्यतिरिक्त पीपीई किट व वाहन निर्जतुकीकरणासाठी एकूण रु. 800 अतिरिक्त यावे लागतील.
           जिल्ह्यांतील नागरिकांनी सुधारीत भाडेदर व्यतिरिक्त रुग्णवाहीका चालक व मालक यांनी अतिरिक्त भाडेदरची आकारणी केल्यास त्याबाबतची  तक्रार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे करण्यात यावी. जेणेकरुन संबंधीत रुग्णवाहीका चालक व मालकावर नियमानुसार कारवाई करणे शक्य होईल, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ