254 अहवाल प्राप्त; 28 पॉझिटीव्ह, 23 डिस्चार्ज, एक मयत




अकोला,दि.29 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 254 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 226 अहवाल निगेटीव्ह तर  28 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2524(2224+300) झाली आहे. आज दिवसभरात 23 रुग्ण बरे झाले. आता 366 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 19056 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 18507, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  382  नमुने होते. आजपर्यंत एकूण 18985 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  16761   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2524(2224+300)आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 28 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 28 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  नऊ महिला व 10 पुरुष आहेत. त्यातील अकोट येथील 15 जण तर उर्वरित दगडीपूल, बांबुळगाव, पांढरी व राणेगाव तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व आठ पुरुष आहेत. त्यात  आलेगाव पातूर येथील दोन जण, बोंदरखेड, गोलाबाजार, हिंगणा रोड, जीएमसी, रौनक मंगल कार्यालय, मुर्तिजापूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

23 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 14 जण, ओझोन हॉस्पीटल व हॉटेल रिजेन्सी येथून प्रत्येकी दोन तर आयकॉन हॉस्पीटल येथून एक अशा एकूण 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. त्यात 60 वर्षीय महिला असून त्या हिवरखेड, तेल्हारा येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 15 जुलै रोजी दाखल झाल्या होत्या. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

366 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2524(2224+300) आहे. त्यातील  जण 104 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2054 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 366 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ