नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांनी सतर्कता बाळगावी- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


अकोला,दि.१०(जिमाका)- सध्या हवामान विभागाच्या वतीने अतिवृष्टि, आरा,वादळ वीज पडणे इ. नैसर्गिक आपत्तींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुचविलेल्या खबरदारीच्या व सुरक्षिततेच्या उपाययोजना याप्रमाणे- वीज पडण्याचे वातावरण तयार झाल्यास घरातील टेलीव्हीजन, संगणक इ.विद्युत उपकरणे स्त्रोतापासून अलग करुन ठेवावीत. या दरम्यान दुरध्वनी व मोबाईलचा वापर टाळावा, घरामध्ये असतांना दारे व खिडक्या बंद करुन सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. आकाशात वीज चमकल्यानंतर दहा सेकंदांनी मेघ गर्जनांचा आवाज आल्यास तिथल्या अंदाजे तीन कि.मी.परीसरात विज पडण्याची शक्यता समजावी.  शेतात काम करीत असाल तर जिथे आहा तिथेच रहा. पायाखाली लाकुड,कोरडा पालापाचोळा ठेवा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर हात ठेवुन डोके जमीनीकडे झुकवा मात्र डोके जमीनवर टेकवु नका. आपले वाहन विजेचे खांब व झाडे यापासुन दुर ठेवुन सावकाश चालवावे. पुरस्थितीत नदी, नाला काठावर पूर पाहण्यास जाऊ नये. नदी नाल्याच्या पुराच्या पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करु नये. सद्यास्थितीत पाऊस सुरु असुन केव्हाही नदीची पाणी पातळी वाढू शकते. नदी, नाल्याच्या दरम्यान पुलावरुन पाणी वाहत असतांना रस्ता ओलांडु नये. आपात्कालिन स्थितीत जवळचे पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, अग्निशमन विभाग, नगरपालिका विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ