शेतकऱ्यांनी आजच पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन



अकोला,दि.30(जिमाका)- जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गंत खरीप हंगाम 2020 करिता पिकविमा काढण्याचे काम कॉमन सर्व्हिस सेंटर(सीएससी) व बँकेव्दारे सुरु असून  शेतकऱ्यांनी पिक विमाचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांनी आजच 31 जुलैपूर्वी सिएससी सेंटर किंवा बँक येथे भेट देवून पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 
कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी या योजनेला पात्र असून बँकांना पिक विमा योजनेचे प्रकरणे स्विकारण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव किवा अचानक उद्भवलेल्या घटनेमुळे पिकांचे होणारे नुकसान यासाठी शेतकऱ्यांना विमाचे संरक्षण देणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश आहे. यासाठी शेतकरी आणि भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी यांच्यासह सर्व शेतकरी संरक्षणास पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार कार्डची प्रत, सातबारा, भाडेपट्टीने शेती करण्यारे यांचा करार, बँकेच्या पासबुकाची प्रत आणि प्रस्तावित पिकांची पेरणी करण्याचे स्व:तचे घोषणापत्र आदि कागदपत्राचा समावेश आहे.  
प्रधानमंत्री पिक विमा योजनाबाबत अडचणी असल्यास शेतकऱ्यांसाठी संपर्क क्रमांक
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी विमा कंपनी म्हणून एचडिएफसी इरगो इन्सूरन्स या विमा कंपणीला तीन वर्षासाठी नियुक्त केले आहे. या कंपणीचे संपर्क अधिकारी प्रत्येक तालुक्यात नेमले असून त्याचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहे. संजय निपाणे, जिल्हा व्यवस्थापक संपर्क क्रमांक 7057502870, महादेव जगताप अकोट ब्लाँक व्यवस्थापक संपर्क क्रमांक 9423486699, अभिषेक रानडे, बाळापूर ब्लाँक व्यवस्थापक संपर्क क्रमांक 8237461040, नरेन्द्र बाहकर बार्शिटाकळी ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9766558561, शुभम हरणे, मुर्तिजापूर ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 8975883826, धिरज कोहार, पातूर ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9552624966, प्रफुल मानकर, तेल्हारा ब्लाँक व्यवस्थापक, संपर्क क्रमांक 9689761512 असे आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना विमा अर्ज व हप्ता भरण्यात अडचण येता कामा नये,याची दक्षता घेण्यात यावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्देश दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ