कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी उपाययोजना
        अकोला,दि.२७(जिमाका)- तेल्हारा तालुक्यातील सात्काबाद येथे लवकर पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या कापूस पिकावर पिक फुलोरा अवस्थेत असतांना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. त्या मुळे या किडीचा प्रादुर्भाव पुढील काही दिवासात इत्तरही भागामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
            त्याकरीता शेतकऱ्यांनी कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेऊन सामुहिकरित्या उपयोजना करुन या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे शक्य होईल. शेतकरी बांधवानी कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना कराव्यात.
१.      कापूस पिक नियमित निरीक्षणात ठेवावे.
२.      कापूस पिकामध्ये निरीक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापळे व व्यवस्थापनासाठी एकरी आठ कामगंध सापळे शेतामध्ये लावावे. कामगंध सापळया मध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून कीटकनाशकाच्या मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे.
३.      कापूस पिकात आढळलेल्या डोम कळ्या प्रादुर्भावग्रस्त पात्या, फुले व बोंडे हाताने तोडून त्यातील अळीसह कीटकनाशक मिश्रीत पाण्यात टाकून नष्ट करावे.
४.    कापूस पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधक उपाययोजना म्हणून करावी.
५.     बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोग्रामा हेक्टरी एक ते दीड लाख अंडी शेतामध्ये लावावी.
६.      या किडीने आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलाडल्यास म्हणजेच शेतात दहा टक्के कीडग्रस्त पात्या, फुले व बोंडे आढळल्यास किवा कामगंध सापळ्यात आठ ते दहा नर पतंग सतत तीन त चार दिवस प्रती कामगंध सापळ्यात असे आढळून आल्यास क्विनॉलफॉस २० टक्के ए एफ २० मिली, थायोडीकार्ब ७५ टक्के डब्लू पी २० ग्रँम व  प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून यापैकी एका किटक नाशकाची फवारणी करावी.
            नोव्हेंबर आधी गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापना करिता सिंथेटीक पायरेथ्रोइडचा, सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन इत्यादी किटक नाशकांचा वापर कटाक्षाने टाळावा जणे जणे करुन पांढरी माशीचा उद्रेक होणार नाही.
      या उपाययोजना करुन शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करावे,असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी दिलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ