शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण करावे.





अकोला,दि.24(जिमाका)-  अकोला जिल्हामध्ये या खरीप हंगामात कापूस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून सद्यःस्थितीत कपाशी पीक बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या नियंत्रणाकरीता सुरूवाती पासुनच काटेकोरपणे नियंत्रण करणे गरजेचे आहे असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांनी सांगितले.
शेतकरी बंधुनी खालील प्रमाणे नियंत्रणाच्या उपायजोजना कराव्यात. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. नियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत.  ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (१.५ लाख अंडी/हेक्टरी) कपाशी पिकात लावावेत.
आर्थिक नुकसानाची पातळी असल्यास एक जिवंत अळी प्रति १० हिरवी बोंडे किंवा ८ ते १० पतंग प्रतिसापळा सलग तीन रात्री. कीटकनाशकांची फवारणी : (प्रतिलिटर पाणी)अझाडिरॅक्टीन (निबोंळी अर्क) (०.१५ टक्के) - ५ मि.लि. किंवा अझाडिरॅक्टीन (०.३० टक्के) - ४ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (५० ईसी) - २ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) - २ ग्रॅम  किंवालॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) - १ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (५० टक्के) + सायपरमेथ्रीन (५ टक्के ई सी) -  २ मि.लि. फवारणी करावी. शेतकरी बंधुनी मार्गदर्शनसाठी  संबंधीत तालुका कृषी अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक,मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी पर्यर्वेक्षक,कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ