ऑटोरिक्षा परवाना वाहन बदली मंजुरीपत्रास मुदतवाढ


अकोला,दि.१७(जिमाका)- ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांनी वाहन बदलीकरीता अर्ज केला असेल त्यांच्या परवान्यावर वाहन नोंदनी करण्यासाठी दिलेली १८० दिवसांच्या मुदतीस लॉकडाऊन कालावधीमुळे मुदतवाढ देण्यात आली आहे,असे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी कळविले आहे.
 ज्या ऑटोरिक्षा परवानाधारकांना ऑटोरिक्षा  परवान्यावरिल वाहन बदलीकरीता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला यांच्या कडे अर्ज सादर केला आहे.  अर्ज सादर केल्यानंतर अशा वाहन परवानाधारकास या कार्यालयाकडून  परवान्यावर वाहन नोंदणी करण्यासाठी १८० दिवसांसाठी मंजूरीपत्र जारी करण्यात आले आहे.  परंतू  कोविड १९ विषाणूच्या समस्येमुळे  वाहन बदलीची प्रक्रिया मंजुरी पत्राच्या दिलेल्या मुदतीत होऊ शकली नाही म्हणून मंजुरीपत्रधारकांचे वैधतेचे नुकसान झाले आहे. अशा मंजुरीपत्रधारकांना मुदतवाढ देण्याचे दि.१४ रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अकोला यांनी ठरविले आहे. त्यासाठी लॉकडाऊन कालावधी  २४ मार्च २०२० ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पुन्हा नियमित सुरु झाल्याचा दिनांक (१८ जून २०२०)  या कालावधीत  ऑटोरिक्षा परवान्यावरील  वाहन बदली करण्याकरीता जारी करण्यात आलेल्या मंजुरीपत्र्ताची वैधता संपलेल्या अर्जदारांनी आपल्या मंजुरीपत्रातील वैधतेची मुदतवाढ करुन घेण्याकरीता कार्यालयात  मुळ मंजुरीपत्रासोबत  ३१ ऑगस्ट  पर्यंत कार्यालयात हजर रहावे. त्यानंतर मुदतवाढीचे मंजुरीपत्र स्विकारण्यात येणार नाही,असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ