496 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 30 डिस्चार्ज, एक मयत
अकोला,दि.27 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 496 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 461 अहवाल निगेटीव्ह तर  35 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2448(2187+261) झाली आहे. आज दिवसभरात 30 रुग्ण बरे झाले. आता 336 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 18670 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 18128, फेरतपासणीचे 166 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  376  नमुने होते. आजपर्यंत एकूण 18520 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  16333  आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2448(2187+261) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 35 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 25 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात 14 महिला व 11 पुरुष आहेत. त्यातील चार जण राणेगाव ता. तेल्हारा येथील ,चार जण हिवरखेड येथील, चार जण पळसोबडे, तीन जण बोरगाव मंजू येथील दोन जण खदान, दोन जण नित्यानंद नगर, दोन जण जुने शहर येथील तर उर्वरित शिवनी, शंकरनगर, तारफैल, निपाना कोठारी येथील रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पाच महिला व पाच पुरुष आहेत. त्यात रामनगर अकोला येथील चार जण, राणेगाव तेल्हारा येथील दोन जण तर उर्वरित हिवरखेड, बाळापूर, पातूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
30 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 11 जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून 10 जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून दोन जणांना तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
एकाचा मृत्यू
दरम्यान काल (दि.26) रात्री एका 40 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला.  ही महिला खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी असून  ती दि.18 रोजी दाखल झाली होती. तिचा काल उपचार घेतांना मृत्यू झाला.
336 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2448(2187+261) आहे. त्यातील  जण 102 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2010 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 336 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ