19 अहवाल प्राप्त; पाच पॉझिटीव्ह, 25 डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि.20(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 19 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 14 अहवाल निगेटीव्ह तर  पाच अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2140(2019+121) झाली आहे. आज दिवसभरात 25 रुग्ण बरे झाले, तर दोन जणांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.आता 282 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 16636 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 16151, फेरतपासणीचे 161 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 324  नमुने होते. आजपर्यंत एकूण 16583 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 14564 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2140(2019+121) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज पाच पॉझिटिव्ह
आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात तीन महिला व दोन पुरुष आहेत. ते अकोला शहरातील जुने शहर, केशव नगर, जेल क्वार्टर, खेतान नगर, जीएमसी या भागातील रहिवासी आहेत.,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
काल(दि.19)रात्री रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याचा आजच्या पॉझिटिव्ह अहवाल व दाखल रुग्ण संख्येत समावेश आहे.
25 जणांना डिस्चार्ज
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, कोविड केअर सेंटर येथून 14, ओझोन हॉस्पिटल येथुन दोन तर हॉटेल रिजेन्सी येथून एक असे 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देण्यात आली आहे.
दोघांचा मृत्यू
दरम्यान काल रात्री दोन जणांचा मृत्यू झाला. हे दोघे पुरुष असून एक 60 वर्षीय इसम गुलजार पुरा येथील तर अन्य एक 55 वर्षीय इसम लक्ष्मीनगर येथील रहिवासी आहे. हे दोघे दि.11 रोजी दाखल झाले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
282 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2140 (2019+121) आहे. त्यातील 104 जण (एक आत्महत्या व 103 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 1754 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 282 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ