कोविडच्या पार्श्वभुमिवर कावड पालखी उत्सवासाठी नियमावली जारी


अकोला,दि.२५(जिमाका)-  श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी‍ जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शिवभक्तांचे कावड व पालखीचे आयोजन  मिरवणुक काढण्याची परंपरा आहे. तथापि, यावर्षी कोविड-१९ च्या संसंर्गजन्य आजारामुळे राज्यात साथरोग अधिनियम १८९७ नुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभुमिवर प्रत्येक सोमवारी तसेच शेवटच्या सोमवारी कावड पालखी उत्सवाबाबत खालील प्रमाणे नियमावली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी एका आदेशाद्वारे जारी केली आहे.
नियमावली याप्रमाणे-
१.      उपविभागीय अधिकारी व संबंधीत उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मंदीराचे विश्वस्त, कावड पालखीचे पदाधिकारी यांचेशी सल्लामसलत करुन, मंदीराचे विश्वस्त यांचेकडून कावड पालखी करिता २० व्यक्तीच्या नावाची यादी प्राप्त करुन घ्यावी. मानाची एक कावड, पायदळ न आणता ठराविक वाहनांमधुन मंदिरातील स्थित पिंडीवर जलाभिषेक करण्याकरीता फक्त त्याच २० व्यक्तीना परवानगी देण्यात येईल.
२.      श्रावण महिन्यातील सोमवार दि. २७जुलै , दि. ऑगस्ट, दि. १० ऑगस्ट व दि. १७ ऑगस्ट या दिवशी येणाऱ्या सोमवारी संबंधीत नदिच्या ठिकाणी तसेच मिरवणूमार्गावर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ नुसार संबंधीत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी स्वतंत्ररित्या प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करावे. या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करता येणार नाही. तसेच पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
३.      कावड पालखी करिता कोणत्याही प्रकारच्या ध्वनीक्षेपक साहीत्याचा वापर करता येणार नाही.
४.    महाराष्‍ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या  दि. १७ मे  रोजीच्या आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळे व पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच धार्मिक कार्यक्रम व यात्रा, जत्रा बंद ठेवण्यात आले आहेत.
५.     मंदिरातील विश्वस्थ, पुजारी यांनाच पूजा अर्चा करण्याची मुभा राहील.
६.      कावड पालखी करिता ज्या भाविकांना परवानगी देण्यात आली आहे, त्यांनी मास्कचा वापर तसेच सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहील.
७.     ज्या शिवभक्तांना कावड पालखी करिता परवानगी देण्यात आली आहे. त्यांचे ॲन्टीजेन रॅपीड टेस्ट करण्यात यावे व त्यांचे अलगीकरण करण्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करावे.
            या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून  यातील अटींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ