रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 580 चाचण्या, 22 पॉझिटिव्ह


अकोला,दि.18(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 580 चाचण्यामध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे अकोला मनपा हद्दीत 25 चाचण्या झाल्या त्यात पाच जण पॉझिटिव्ह आले. अकोला ग्रामीण मध्ये 120 चाचण्या होऊन एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. अकोट येथे 58 चाचण्या होऊन त्यात नऊ जण पॉझिटीव्ह आले. तेल्हारा येथे 78 जणांच्या होवून दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाळापूर येथे 197 चाचण्या होऊन चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पातूर येथे चाचण्या झाल्या नाही. बार्शीटाकळी येथे 27 चाचण्या झाल्या त्यात आज दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर मुर्तिजापुर येथे 75 जणांच्या चाचण्या होऊन एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे दिवसभरात 580 चाचण्यांमध्ये 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आजअखेर जिल्ह्यात 1992 रॅपिड ॲन्टीजन टेस्टव्दारे 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे,असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ