४२३ अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, २७ डिस्चार्ज


अकोला,दि.१७(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे  ४२३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४०२ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या २०२६ (१९५९+६७) झाली आहे. आज दिवसभरात २७ रुग्ण बरे झाले,असून आता २६० जणांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण १६१४८   जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १५६७१, फेरतपासणीचे  १६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१७  नमुने होते. आजपर्यंत एकूण १६०५३  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १४०९४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १९५९आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज २१ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात २१ जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. सकाळी प्राप्त अहवालात १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व आठ पुरुष आहेत.  त्यात अकोट, मुर्तिजापूर, सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, तर बोरगाव मंजू, लोकमान्य नगर, सिद्धी विनायक हॉस्पिटल, शंकरनगर, रामगर, जीएमसी होस्टेल, तेल्हारा, बादखेड ता. तेल्हारा, पातूर, येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.  तर सायंकाळी सहा जणांचे पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. ते  मोठी उमरी, सातव चौक, सिंधी कॅम्प, लोहारा ता. बाळापूर,  मुर्तिजापूर, हिवरखेड ता. तेल्हारा येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
काल (दि.१६) रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्ट मधील ४६ जणांचे पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा समावेश आजच्या एकूण पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह संख्येत केला आहे.
२७ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन, कोविड केअर सेंटर मधून २२ तर हॉटेल रिजेन्सी मधून दोन  अशा एकूण २७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले तेल्हारा, मुर्तिजापूर आणि मलकापूर-अकोला येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या २२ जणांपैकी आठ जण बाळापूर येथील, पाच जण अकोट येथील,  चार जण महान येथील, दोन जण चांदूर येथील तर बार्शी टाकळी, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली.
२६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या २०२६(१९५९+६७) आहे. त्यातील ९९ जण (एक आत्महत्या व ९८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची १६६७ संख्या  आहे. तर सद्यस्थितीत २६० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ