वसाली साधना आश्रम पर्यटनस्थळ विकासाचा आराखडा तयार करा- पालकमंत्र्यांचे निर्देश



अकोला,दि.२३(जिमाका)- पातूर तालुक्यातील वसाली येथील सितान्हाणी या परिसराचा व तेथे उभारण्यात आलेल्या साधना आश्रमाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठीचा आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
पातुर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या वसाली येथील  घनदाट जंगलातील साधना आश्रमा आहे. या परिसरात काल (दि.२२) रात्री पालकमंत्री ना. बच्चू कडू व  आमदार नितीन देशमुख यांनी रात्रभर प्रत्यक्ष मुक्काम करून स्थानिकांच्या समस्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेतसरपंच सुखनंदन डाखोरे, ग्रामसेवक अशोक बरके, तहसीलदार दीपक बाजड, वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे, प्रकल्प अधिकारी बाल विकास समाधान राठोड, पोलीस निरीक्षक गणेश वानरे अन्य अधिकारी उपस्थित होते.
काल सायंकाळी सात वाजेपासून तर रात्रीचे दहा वाजेपर्यंत पालकमंत्र्यांनी स्थानिक आदिवासी रहिवाशांच्या समस्या समजून घेतल्या. त्यावरील उपाय योजना प्राधान्यक्रमाने केल्या जातील असे आश्वस्त केले. तसेच या भागातील प्राथमिक सुविधांचा विकास आराखडा तयार करावा असे यंत्रणेस निर्देश दिले.
 यावेळी त्यांनी वसालीच्या साधना आश्रमाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल याबाबत शासकीय विभागांसोबत नियोजन केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ