पालखी मिरवणुकःराजराजेश्वर मंदिर परिसरातील रहदारी मार्गात बदल


अकोला,दि.२५(जिमाका)- अकोला शहरामध्ये श्रावण महिन्या शिवभक्त श्री राजराजेश्वर मंदिरा दर्शनासाठी गर्दी करतात. या कालावधीत वाहतुक सुरळीत राहण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी  राजराजेश्वर मंदिर परिसरातील  वाहतुक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.
वाहतुक मार्गात केलेले बदल याप्रमाणे-
सध्या सुरु असलेला मार्ग-डाबकी रोड-जुने शहर-श्रीवास्तव चौक-विठ्ठल मंदिर-अलका बॅटरी चौक-जयहिंद चौक-कोतवाली चौक-गांधी चौक-अकोला बस स्थानक तसेच डाबकी रोड जुने शहर ते  भिमनगर चौक दगडीपुल मार्ग, मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक व येणारे वाहतूक
पर्यायी मार्ग- डाबकी रोड-जुने शहर-भांडपुरा चौक-पोळा चौक-किल्ला चौक-हरिहरपेठ-वाशिम बायपास चौक-राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा ते लक्झरी स्टँन्ड  सरकारी बगीचा- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन अशोक वाटीका ते अकोला बसस्थानक.
सध्या सुरु असलेला मार्ग- अकोला बस स्थानक-गांधी चौक- कोतवाली चौक-जयहिंद चौक-पोळा चौक, हरिहरपेठ-वाशिम बायपास चौककडे जाणारी व येणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- अकोला बसस्थानक-अशोक वाटीका चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-सरकारी बगीचा लक्झरी स्टँन्ड-वाशिम बायपास चौक-हरिहर पेठ-किल्ला चौक- भांडपुरा चौककडे जाणारी व येणारी वाहतुक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ