अतिवृष्टीचा इशारा



अकोला,दि.23(जिमाका)- हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शनिवार (दि. 25) पर्यंतच्या कालावधीत  जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, वारा, वादळ, विज पडणे इत्यादी नैसर्गिक आपत्ती होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. 
पुर्णा नदीवर असलेल्या घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे पाण्याची पातळी 255.50 घ.मी. असुन  सद्यस्थितीत सात गेट मधुन पाण्याचा विसर्ग पुर्णा नदीमध्ये होत आहे. तरी याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने नदी काळावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा व संबधित अधिकारी/कर्मचारी/मंडळ अधिकारी/तलाठी/ ग्रामसेवक कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच पूरबाधित क्षेत्रातील लोकांची योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना