पालकमंत्री ना. बच्चु कडू यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि.१०(जिमाका)-राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण,  महिला व बालविकास  इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,  भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण,  कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  ओमप्रकाश उर्फ  बच्चू कडु  हे  शनिवार दि. ११ रोजी जिल्हा दौऱ्यावर  येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
शनिवार दि. ११ रोजी  दुपारी १२  वा. मौजे कुंभारी ता. जि. अकोला  येथे आगमन व गणेश महाविद्यालय, कुंभारी ता. अकोला  येथे वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी पाऊण  वा. जिल्हाधिकारी  कार्यालय, अकोलाकडे प्रयाण. दुपारी एक वा. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आगमन व अंपग लाभार्थ्यास सायकल वाटप. दुपारी एक ते दोन वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे कोविड- १९ बाबत आढावा बैठक व  दुपारी दोन वा. श्री राज राजेश्वर कावड यात्रा बाबत चर्चा, दुपारी तीन  वा. शासकीय विश्रामगृह येथे राखीव व सवडीने मुर्तिजापुर मार्गे अमरावती कडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना