कोरोनाची लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन





        अकोला,दि.28(जिमाका)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी कोरोनाचे लक्षण दिसताच त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क साधून चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागरिकांना केले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या संदर्भांत उपाययोजना व रुग्णाना रुग्णालयातील सोयी सुविधाबाबत आढावा घेताना, ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त संजय कापडनीस, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. अनिरुध्द अष्टपुत्रे, डॉ. सिरसाम, डॉ. नेताम यासह वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
            जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असून आता ग्रामीण भागातूनही मोठया प्रमाणात रुग्ण समोर येत आहे. कोरोनाचा रुग्ण उशीरा रुग्णालयात पोहचत असल्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होवून त्याचा मृत्यू होण्याचा धोका संभावतो. हे सर्व टाळण्यासाठी नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच वेळ न गमावता त्वरित आरोग्य विभागाची संपर्क साधून कोरोनाची चाचणी करुन घ्यावी. यामुळे वेळीच उपचार होवून मृत्यूचे प्रमाण आटोक्यात येवू शकते, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोविड रुग्णांना मिळत असलेल्या सोयी सुविधाबाबत आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवावे व त्यांना उत्तम सोयीसुविधा प्रदान कराव्या.
            रुग्णांच्या नातेवाईकासोबत ठराविक वेळ ठरवून देवून त्यांना मोबाईलव्दारे  व्हिडीओ कॉलव्दारा संपर्क करुन द्यावा व यांची स्वंतत्र्य नोंद ठेवावी तसेच कोवड वार्डात लावलेल्या सीसीटीव्हीवर मॉनिटरिंग करावे. कोविड वार्डात ब्रॉडबॅन्ड सेवा उपलब्ध करुन द्यावी आदि सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. रुग्णाच्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तू रुग्णाला भरती करताना त्यांच्या नातेवाईकाकडे सुपूर्द करावे. यांची सर्व जबाबदारी हॉस्टेल मॅनेजर यांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. कोविड संबंधी तक्रार असेल तर त्याबाबत कोणासी संपर्क साधावा याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावे. येणाऱ्या छोट्या मोठ्या तक्रारीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ