पालकमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांगांना सायकल वाटप


            अकोला, दि.11(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्याहस्ते आज दिव्यांग लाभार्थ्यांना तिनचाकी सायकल वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दुपारी हा कार्यक्रम पार पडला. ज्ञानेश्वर रमेश ठाकरे व राहुल अरविंद शाह या दोन दिव्यांग लाभार्थ्यांस तिन चाकी सायकल वाटप करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम