257 अहवाल प्राप्त; 40 पॉझिटीव्ह, 19 डिस्चार्ज



अकोला,दि.22 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 257 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 217 अहवाल निगेटीव्ह तर  40 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2246(2071+175) झाली आहे. आज दिवसभरात 19 रुग्ण बरे झाले.आता 344 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 17126 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 16620, फेरतपासणीचे 162 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  344  नमुने होते. आजपर्यंत एकूण 17025 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  14954 आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2246(2071+175) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 40 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 40 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात  २४ महिला व १६ पुरुष आहेत. त्यातील १६ जण हे पातूर येथील, तीन जण हिवरखेड येथील, बोरगांव मंजू, सातव चौक, खदान, अकोली जहाँगीर, वाडेगाव, आलेगांव येथील प्रत्येकी दोन,  तर मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी हॉस्टेल, खडकी, विजय नगर, न्यु भीम नगर व रामदास पेठ येथील  प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त 64 अहवालांत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून देण्यात आली आहे.
19 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तिन जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून एक जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सात जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना  अशा एकूण 19 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
344 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूणपॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2246(2071+175) आहे. त्यातील 104 जण (एक आत्महत्या व  103 कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  1798 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 344 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ