रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 89 चाचण्या, एक पॉझिटिव्ह


        अकोला,दि.26(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 89 चाचण्यामध्ये एक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात आज चाचण्या झाल्या नाहीत. अकोट येथे 71 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर,  तेल्हारा मुर्तिजापूर या भागात आज चाचण्या झाल्या नाहीत. तसेच अकोला जिल्हयातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 16 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे एकूण 89 चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात 5328 चाचण्या झाल्या असून 266 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ