जिल्हयात पोलिस अधिनियम 1951 चे 37(1)(3) कलम लागू




अकोला,दि.15(जिमाका)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवण्याच्या माध्यमातून आगामी सन उत्सव पाहता सर्वसामान्य लोक हे उत्सव साजरे करण्याच्यादृष्टीकोणातून एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनाकडून विविध प्रश्नाच्या मागीण करता धरणे, मोर्चा व आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी कायद्या व सुव्यवस्था  राखण्याच्या दृष्टीने जिल्हयात दि. 27 जुलैचे मध्यरात्रीचे (12 वा.) पर्यंत जिल्हयात पोलिस अधिनियम 1951 चे 37(1)(3) कलम लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
हा आदेश  लागू केलेल्या दिनांकापासून सुपूर्ण जिल्हामध्ये पुढील बाबीकरीता मनाई करण्यात आली आहे. आंदोलने करण्यास व मोर्चे काढण्यास पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना एकत्रित येण्यास मनाई करण्यात येत असुन शासनास निवेदने सादर करण्याकरिता पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रतिबंध राहील. सदर आदेशाचे उलंघन केल्यास संबंधितांवर सक्त कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेण्यास मनाई, दगड किंवा तशी साधने बाळगणे व तशी साधने जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची प्रेते किंवा मनुष्यकृतीच्या प्रतिमा / आकृत्या व त्यांचे प्रदर्शन करणे, वाट्य वाजविणे,किंकाळया फोडणे किंवा जाहिरपणे प्रक्षोभक घोषणा करणे इत्यादी, अश्या प्राधिकारांच्या मते ज्यामुळे नागरी सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे. सोंग आणणे,पत्ते खेळणे आणि तशी चित्रे फलके किंवा इतर कोणत्याही  जिन्नस वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकांमध्ये प्रसार करणे, शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठया तसेच शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येतील अश्या इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ