MyGov ठरले प्रशासनातील लोकसभागाचे उत्तम उदाहरण केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांचे प्रतिपादन


            अकोला,दि.26(जिमाका)- केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या MyGov हा डिजीटल उपक्रम प्रशासनातील  उत्तम लोकसहभागाचे उदाहरण ठरला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी आज येथे केले.
            केंद्र शासनाच्या MyGov  या उपक्रमाला आज सहा वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त आयोजित  ऑनलाईन कार्यक्रमात ना. धोत्रे सहभागी झाले होते. या कार्यक्रमास केंद्रीय न्याय-विधि, संचार, आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री ना.रविशंकर प्रसाद, इलेक्ट्रॉनिक माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे  चे सचिव अजय प्रकाश साहनी,  MyGov चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह आदी मान्यवर सहभागी झाले होते.
            यावेळी माहिती देण्यात आली की, MyGov  या केंद्रशासनाच्या उपक्रमाला आज सहा वर्ष पूर्ण झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते दि. 26 जुलै 2014 ला हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला होता. सन 2014 ते आजतागायत MyGov शी  एक कोटी 22 लाख यूजर्स  जोडले गेले आहेत. आतापर्यंत  953 Tasks मध्ये  सात लाखांहून अधिक सबमिशन आहेत तर 45 लाखांहून अधिक प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. ट्विटर वर सुद्धा 2.1 मिलीयन फॉलोअर्स  असून  फेसबुक वर 1.1 मिलियन आणि  इंस्टाग्राम पर एक मिलियन हून अधिक फॉलोअर्स आहेत.
            आपल्या संबोधनात ना. धोत्रे म्हणाले की, या डिजिटल सुविधेमुळे देशातील सामान्य नागरिकांकडून उत्तम सुचना शासनाला मिळाल्या. उत्तम प्रशासनात ह्या सुचना मौलिक ठरल्या. MyGov द्वारे सर्व नागरिक व सहभागी यंत्रणा  आपल्या सुचना ह्या शासनाचे विविध विभाग अथवा धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचवू शकतात.  नागरिकांशी थेट संवाद व शासकीय धोरणांचा विस्तार करण्यासाठी  MyGov उपयुक्त ठरले आहे.
            ते पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या शासन प्रणालीने  डिजीटल अवकाशात स्वतःचे स्थान बळकट केल्याचे यावरुन दिसून येते. त्यामुळेच  MyGov ला सर्व मंत्रालये व विभागांचे पाठबळ मिळाले. शासनाची धोरणे व योजना विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे.  केवळ केंद्रच नव्हे तर 12 राज्यांचे सरकारही याद्वारे आपल्या जनतेशी जोडली गेली आहेत. लवकरच अन्य राज्यांनाही या माध्यमाशी जोडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नागरिकांकडून येणाऱ्या सुचनांचा स्विकार करुन धोरणे ठरविणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश तयार करणे व तयार केलेल्या योजनांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविणे अशी दुहेरी जबाबदारी  MyGov ने सक्षमपणे पार पाडली आहे. कोविड सारख्या संकट काळातही हे माध्यम महत्त्वाचे ठरले आहे. याच द्वारे मनुष्यबळ विकास मंत्रालयाची  लहान बालके, पालक, विद्यार्थी यांच्यासाठी तयार केलेली 'मनोदर्पण' ही प्रणाली  असो वा प्रधानमंत्र्यांनी केलेले आत्मनिर्भर भारत च्या आवाहनाचा भाग म्हणून 'डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत इनोवेट चैलेंज' देखील MyGov द्वारे लॉन्च करण्यात आले. गत सहा वर्षात यामुळे डिजीटल अवकाश प्राप्त करत  प्रशासनातील लोकसहभागाचे एक उत्तम उदाहरण घालून देण्यात आले आहे.  येत्या काळात देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा मानस ना. धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला. कोरोना संकटाच्या काळात ऑनलाईन शिक्षण ऑनलाईन व्यवहाराला महत्त्व प्राप्त झाले असतांना MyGov ची  भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. येत्या काळात MyGov चे उद्दिष्ट हे लोकाभिमुख प्रशासन असावे अशी अपेक्षा ना. धोत्रे यांनी व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ