मुगावरील विषाणुजन्य रोग लिप क्रिंकल विषाणुची लक्षणे व उपाययोजना



अकोला,दि.31 (जिमाका)- या वर्षीच्या हंगामामध्ये मुंग पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव हा रस शोकिडीमार्फत होत असतो.  सर्वप्रथम किडींची लक्षणे नविन आलेल्या पानावर आढळून येतात व त्यामुळे पानातील हरीत द्रव्य कमी  झालेले आढळून येते व पानाचा भाग हिरवा, पिळा दिसुन येतो. काही पाने दुमडल्याप्रमाणे किंवा पर्णगुच्छ झाल्यासारखे होतात. पानाच्या कडाखालच्या बाजुला ळतात. पानाच्या शिरा खालच्या बाजूने लाल रंगाच्या होतात. पेरणीपासून ५ आठवड्यात लक्षणं दिसु लागतात, त्यामुळे झाडांची वा खुंटते व जास्त प्रादुर्भावग्रस्त झाडे जागीच सुकून वाळू लागतात.
रोगाची लागण झाल्यामुळे  पर्णगुच्छ होवुन आठवड्याभरात प्रादूर्भावग्रस्त झालेली झाडे सुकून सदर रोगाचा प्रादुर्भापिकाची पुर्ण वाढ झाल्यावर पानाचा रंग हिरवट पिवळा होतो व झाड़े सूकत नसून हा रोग बियाण्यामुळे होतो. किंवा प्रादुर्भाग्रस्त पाने सशक्त पानाच्या संपर्कांत आल्यामुळे होतो.
या करीता शेतकरी बंधूनी पुढीलप्रमाणे उपाययोजना केल्यास निश्चितच प्रतिबंध केल्या जावु शकतो. शेतकऱ्यांनी  सुधारीत वानाचा वापर करावा, शेतकऱ्यांनी सुरवातीच्या काळात प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्कांची ५ टक्के फवारणी करावी, प्रादुर्भाव वाढल्यास डायमेथोएट ३० टक्के प्रवाही किंवा इमीडाक्रोप्लोड ६०० एफएस (@ ५ किलो प्रती बियाण्याला लाबुन पेरणी करावी, शेतकऱ्यांनी शेतात हेक्टरी १२ पिवळे चिकट सापळे लावावे, मिथील डीमेटॉन २५ टक्के प्रभावी ५०० मि.ली. प्रती हैक्टर किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रभावी ५०० मि.लो. प्रती हेक्टरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने कोणत्याही एका किटकनाशकांची फवारणी करावी. (सदर उपाययोजना केंद्रीय
किटक मंडळाच्या निदान नाहीत कारण मुंग पिकावर कुठलीही किटकनांशके रजीस्टर्ड नाही) असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ