२३० अहवाल प्राप्त; २१ पॉझिटीव्ह, ८१ डिस्चार्ज


अकोला,दि.१०(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे २३० अहवाल प्राप्त झाले. त्यातील २०९ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले.  आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १८४९(१८२८+२१)  झाली आहे. आज दिवसभरात ८१ रुग्ण बरे झाले. त्यात जिल्हा कारागृहातील ६९ बंदीजनांचा समावेश आहे. आजअखेर ३०८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १३९१६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १३४७६, फेरतपासणीचे १५७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २८३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १३७६५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११९३७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १८४९ (१८२८+२१)आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज २१ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात २१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळी प्राप्त अहवालात १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व सात पुरुष आहेत. त्यातील तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शी टाकळी, दोन कृषिनगर  तर उर्वरीत तारफैल, कावसा ता. अकोट व पातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. तर आज सायंकाळी प्राप्त अहवालात  आठ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व सात पुरुष आहेत. त्यातील चार जण कंवरनगर येथील, तर उर्वरीत बाळापूर, बोरगाव, सिंधी कॅम्प व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून देण्यात आली.
 जिल्हा कारागृहातील ६९ जणांसह ८१ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात ८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज दुपारनंतर कोविड केअर सेंटर मधून पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात तिघे बाळापूरचे तर दोघे हरिहर पेठ येथील रहिवासी आहेत, अशी माहिती कोविड केअर सेंटर येथून देण्यात आली. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील दोन जण डाबकी रोड येथील रहिवासी असून  उर्वरित वाशीम बायपास, हरिहर पेठ, सिव्हिल लाईन, पातूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच जिल्हा कारागृहातील कोविड केअर सेंटर मधील ६९ जण बरे झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. तथापि, कोरोनातून  बरे झालेले कैदी केवळ कारागृहात स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज झाले आहेत. त्यांची कारागृहातच स्वतंत्र व्यवस्था व देखभाल केली जात आहे, असे जिल्हा कारागृह  प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३०८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १८४९ (१८२८+२१) पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ९१ जण (एक आत्महत्या व ९० कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १४५० आहे. तर सद्यस्थितीत ३०८ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ