महाडिबीटी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज दि.१७ पुर्वी अग्रेषित करण्याचे आवाहन
अकोला,दि.९(जिमाका)- सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील महाडिबीटी प्रणालीवरील अनुजाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती
व शिक्षण फी परिक्षा फी योजनेचे काही अर्ज अजुनही महाविद्यालयस्तरावर
प्रलंबित असल्याने
हे अर्ज महाविद्यालयांनी जिल्हा लॉगईनला अग्रेषित करण्यासाठी दि. १७ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढवुन दिली आहे. तेव्हा प्रलंबित अर्ज दिलेल्या मुदतीत पडताळणी करून जिल्हा कार्यालयाकडे
ऑनलाईन अग्रेषित करावेत.
विहित मुदतीत अर्ज जिल्हा कार्यालयाकडे सादर न केल्यास लाभापासुन विद्यार्थी वंचित राहील्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील
याची नोंद घ्यावी , असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा