खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलै शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, कृषि विभागाचे आवाहन




अकोला,दि.24(जिमाका)- अकोला जिल्ह्यत प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढील तीन आर्थिक वर्षासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामध्ये सन 2020-21, 2021-22 2022-23 वर्षांचा समावेश आहे. ही योजना आता खरीप व रब्बी हंगामातील अधिसुचीत पिकांकरीता लागू करण्यात आली असून  या योजनेची खरीप हंगाम 2020 ची अंतिम दिनांक 31 जुलै 2020 आहे. या योजनेकरीता खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस व मका पिके अधिसुचीत करण्यात आली आहे.
            शेतकऱ्यांना शेतमालच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी, लावणी, उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती याबाबींकरीता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. खरीप हंगाम सन 2020-21 पासुन योजनेत सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी कागदपत्रे सादर करावीत. 
            अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन या हंगामापासून गावपातळीवर अधिकची सुविधा म्हणुन आपले सरकार सेवा केंद्राद्वारे म्हणजेच महा ई सेवा केंद्रावर सदर योजनेत सहभागी होता येणार आहे. विमा अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. किंवा पिक विमा www.pmfby.gov.in या पोर्टलवर थेट अर्ज करू शकतील. तरी शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 31 जुलै 2020 पर्यंत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.  विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबबतची सुचना विमा कंपनी संबंधित बँक, कृषि / महसुल विभाग यांच्याशी संपर्क साधावा.
            शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागासाठी नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ यांचे वतीने करण्यात येत आहे.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ