रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 830 चाचण्या, 32 पॉझिटिव्ह


अकोला,दि.20(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 830 चाचण्यामध्ये 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न  झाले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण भागात 65 चाचण्या होऊन दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  अकोट येथे 86 चाचण्या झाल्या आणि तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  बाळापूर येथे  156 जणांच्या चाचण्या होऊन  10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. बार्शी टाकळी येथे  26 जणांच्या चाचण्या होऊन एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  पातूर येथे  223 जणांच्या चाचण्या होऊन  11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  तेल्हारा येथे 30 जणांच्या चाचण्या होऊन  एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.  मुर्तिजापूर येथे 187 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात  तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  अकोला मनपा हद्दीत  46 चाचण्या झाल्या व पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर अकोला येथे 11 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. असे एकूण 830 चाचण्या होऊन त्यात 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  आतापर्यंत जिल्ह्यात 3204 चाचण्या झाल्या असून 153 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम