३७४ अहवाल प्राप्तः ३९ पॉझिटीव्ह, २८ डिस्चार्ज


अकोला,दि.६(जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ३७४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३३५ अहवाल निगेटीव्ह तर ३९ अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या १७४२  झाली आहे. आज दिवसभरात २८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आजअखेर ३६७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार आजपर्यंत एकूण १२७०६ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १२२९९, फेरतपासणीचे १५२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २५५ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२६१२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १०८७० आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १७४२ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ३९ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात ३९ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सकाळच्या अहवालात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात १७ महिला तर १६ पुरुष रुग्ण आहेत. ते बाळापूर येथील ११, बोरगाव मंजू येथील पाच, जेल क्वार्टर येथील तीन, पोळा चौक येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन तर उर्वरित ज्ञानेश्वर नगर, मोठी उमरी, वानखडे नगर, कैलास नगर, आदर्श कॉलनी, वाशीम बायपास, महान, अकोट, खामगाव बुलडाणा व मालेगाव वाशीम येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर सायंकाळच्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला(१३ महिन्यांच्या बालिकेसह) व तीन पुरुष आहेत (एक चार वर्षे व एक आठ वर्षीय बालकांसह) या रुग्णांपैकी चार जण गिता नगर येथील तर अन्य नानक नगर व कच्ची खोली येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत ,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
२८ जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १० तर कोविड केअर सेंटर येथून १८  अशा एकूण २८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज दिलेल्या १० जणांपैकी  चार जण हे सिंधी कॅम्प येथील, दोन जण ज्ञानेश्वर नगर, तर उर्वरीत  आदर्श कॉलनी, शिवसेना वसाहत, बाळापूर व अकोट येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत. कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज दिलेल्या १८ जणांपैकी आठ जण हरिहर पेठ येथील, सात जण बाळापूर येथील तर  दोन जण पातूर व एक जण  सिंधी कॅम्प येथील रहिवासी आहे.
३६७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत  एकूण १७४२ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ८९ जण (एक आत्महत्या व ८८ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १२८६ आहे. तर सद्यस्थितीत ३६७ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना