जिल्ह्यात आतापर्यंत १८ लाख ४४ हजार ३४१ क्विंटल कापसाची खरेदी



    अकोला,दि.२७(जिमाका)- चालू हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत ६२ हजार ९९३ शेतकऱ्याकडून १८ लाख ४४ हजार ३४१  क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कोरोनाचा प्रार्दुभाव होण्याआधी ३६ हजार शेतकऱ्याकडून १०  लाख ९४ हजार ६४१ क्विंटल खरेदी करण्यात आली हेाती.  कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर २६ हजार ९९० शेतकऱ्याकडून सात लाख ४९ हजार  ७००  क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
      यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, कापूस पणन महासंघाने सहा हजार ८६६ शेतकऱ्यांकडून एक लाख ८५ हजार ५०६ क्विंटल,  सीसीआयने ४६ हजार १४० शेतकऱ्यांकडून १३ लाख ५३ हजार ४८३  क्विंटल, खाजगी बाजार समितीकडून चार हजार ७९१ शेतकऱ्यांकडून एक लाख ४५ हजार ८४ क्विंटल, थेट पणन परवानाधारकाकडून  १२१ क्विंटल तर खाजगी बाजारात पाच हजार १९६ शेतकऱ्यांनी एक लाख ६० हजार १४७  क्विंटल खरेदी करण्यात आली अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक श्रीकांत खाडे यांनी दिली.
राज्यात गेल्या १० वर्षातली विक्रमी कापूस खरेदी
राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी २१८.१३  लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.  गुरुवार दि. २३ जुलै रोजी या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या १० वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.
या खरेदीचे एकूण मुल्य ११,७७६.८९ कोटी रुपये असून आतापर्यंत ११०२९.४७ कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआय ने ३० सप्टेंबर २०२० पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.
राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-१९ च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे ९१.९० व ५४.०३ लाख क्विंटल अशी एकूण १४५.९३ क्विंटल कापूस खरेदी केली.
कोव्हिड-१९ च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-१९ च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आतापर्यंत अनुक्रमे ३५.७० व ३६.७५ लाख याप्रमाणे ७२.४५ लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी ४१८.८ लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता ४१० लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण आठ लाख ६४ हजार ७२ शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ