मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर; महसूल व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई


अकोला,दि.३(जिमाका)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमिवर मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी आज महसूल व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करुन शहरात १०१ जणांकडून  २१ हजार ४७० रुपयांचा दंड वसूल केला. उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी ही मोहिम शहरातील  विविध भागात राबवली. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे शहरात खळबळ उडाली. शहरातील सिटी कोतवाली येथून ही मोहिम राबविण्यास शहरातील राम मंदीर परिसर, कपडा बाजार, तिलक रोड, गांधी रोड,  दुर्गा चौक इ. ठिकाणी १०१ जणांवर कारवाई करुन दंड वसूली करण्यात आली.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना