ग्रामीण भागात कोविडचा फैलाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मतक उपाययोजना प्रभावीपणे राबवा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश



        अकोला,दि.26(जिमाका)- जिल्ह्यात  ग्रामीण भागामध्ये C कोविड-19 बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये  दिवसेंदिवस झपाटयाने वाढ होत आहे.  हा फैलाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना  प्रभावीपणे राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत. त्यासाठी त्यांनी  मार्गदर्शक सुचनाही निर्गमित केल्या आहेत.
            यासंदर्भात जिल्हाधिकारी पापळकर यांनी निर्देशीत केले आहे की, तालुक्यातील/ग्रामीण भागामध्ये कोविड-१९ बाधीत व्यक्तींची आकडेवारी वाढत आहे, त्यामुळे अतिशय बारकाईने काटेकोरपणे काम करणे आवश्यक आहे. त्या‍चप्रमाणे सर्व विभागाशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी खालील दिलेल्या सुचनांप्रमाणे नियोजन करावे.
1. Antigence Test- आपल्या कार्यक्षेत्रातील  शहरी व ग्रामीण भागातील संशयित व्यक्तीचा शोध घेऊन तसेच 60 वर्षावरील दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींची  तपासणी करून त्यांची Antigence Test घेण्यात यावी.   तसेच  ज्यांचे SpO2 Level कमी आहे, अशा व्यक्तींचे Swab घेण्यात येऊन त्यांना तात्काळ दवाखान्यांमध्ये भरती करण्यात यावे.
2. संपूर्ण शहरी ग्रामीण भागाची आरोग्य तपासणी करणे-  महानगरपालिका व  नगरपालिका क्षेत्रातील यंत्रणेमार्फत तसेच  ग्रामीण भागातील तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फत आरोग्य तपासणी करण्यात यावी.  व त्यांचा डेटा दररोज एकत्रित करण्यात यावा.  त्या तपासणी मधून Suspected, SpO2 Level कमी असणाऱ्या  व्यक्ति , दुर्धर आजारांच्या  व्यक्तींची माहिती वेगळी करून त्यांचे Swab घेण्याचे  नियोजन करण्यात यावे.
3. High Risk / Low Risk मधील कॉन्टॅक्ट शोधणे-  पॉझिटिव्ह रुग्ण आल्यानंतर त्यांचे  High Risk / Low Risk कॉन्टॅक्ट शोधण्यात यावे. High Risk कॉन्टॅक्ट व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात  ठेवण्यात यावे.  त्यानंतर त्यांचे 4 ते 5  दिवसांनी Swab घेण्यात यावे.  पॉझिटिव्ह आल्यास दवाखान्यात भरती ठेवण्यात यावे.  निगेटिव आल्यास 14 दिवस  Quarntine ठेवण्यासाठी घरी सोडण्यात यावे.
4. CCC/ Quarantine  सेंटरची व्यवस्था-  यापूर्वीचे आदेशानुसार सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करावी.  कोणाची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
5. कोविड-19  संक्रमणाची साखळी तोडण्यात  यावी-  RTPCR  तपासणीसाठी Swab घेण्याचे नियोजन करण्यात यावे.  जास्तीत जास्त Swab घेण्यात यावे.
6. नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक वॉर्डमध्ये नगरसेवक, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी यांचे मार्फत मोहल्ला समिती गठीत करावी,  व प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर कोरोना विरुद्ध लढा समिती गठित करून वारंवार त्यांच्या संपर्कात रहावे.
7. शहरी भागातील व ग्रामीण भागातील खाजगी प्रॅक्टिशनर यांच्यामार्फत कोविड -19  ची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची माहिती  दररोज एकत्र करण्यात यावी व त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे Swab घेण्याचे नियोजन करण्यात यावे.
8. ज्या भागांमध्ये Swab देण्याकरिता, तपासणी करिता काही व्यक्ति बाहेर येत नसतील, सहकार्य करीत नसतील तर त्या भागातील प्रतिष्ठित व्यक्ती, सेवाभावी संस्था, लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य घ्यावे. एवढे करूनही  सहकार्य करीत नसल्यास पोलीस विभागामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. 
9. नगरपालिका क्षेत्रात व मोठ्या गावाकरिता तालुक्यातील प्रमुख वर्ग 1 व वर्ग 2 चे अधिकारी यांचेकडे झोनल ऑफिसर म्हणून  नियुक्ती करून  त्यांच्यावर सर्व प्रकारची जबाबदारी सोपविण्यात यावी.
10. Effective Containment Zone बाबत योग्य ती कार्यवाही करावी. 
11. पोलीस विभागामार्फत मास्क  न लावणाऱ्या तसेच सोशल डिस्टंसिंगचे  पालन न करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी.
12. आपल्या तालुक्यातील रुग्णसंखेचा विचार करून Qurantine facility   CCC वाढवण्याबद्दल आवश्यक ते नियोजन करण्यात यावे.
13. तालुकस्तरावरून पेशंट जिल्हास्तरावर आणण्याकरिता किवा दवाखान्यात  येण्याकरिता आवश्यक तेवढ्या Ambulance आहेत किंवा नाही याची खात्री करावी.  नसल्यास खाजगी Ambulance अधिग्रहीत  करण्यात याव्यात.
            कोविडचे काम करीत असताना सर्व अधिकारी कर्मचारी, महसूल अधिकारी, पोलिस कर्मचारी व इतर सर्व अनुषंगिक कर्मचारी यांनी पुरेशी काळजी घेऊन काम  करतील या बाबत दक्षता घ्यावी जेणेकरून कोविड संक्रमणापासून बचाव करता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ