395 अहवाल प्राप्त; 37 पॉझिटीव्ह, 16 डिस्चार्ज, एक मयत





अकोला,दि.30 (जिमाका)-आज दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 395 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 358 अहवाल निगेटीव्ह तर  37 अहवाल पॉझिटीव्ह आले. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 2579(2261+318) झाली आहे. आज दिवसभरात 16 रुग्ण बरे झाले. आता 404 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 19463 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 18902, फेरतपासणीचे 167 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे  394  नमुने होते. आजपर्यंत एकूण 19380 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या  17119   आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल 2579(2261+318) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 37 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात  18 महिला व 16 पुरुष आहेत. त्यातील मोठी उमरी येथील सात जण, वानखडे नगर व कोठारी येथील प्रत्येक पाच, उगवा व वाडेगाव प्रत्येकी तीन, तेल्हारा, हिवरखेड व भिम नगर येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित राणेगाव तेल्हारा, बाळापूर, शिवसेना वसाहत, रेणूका नगर व केशव नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुष आहेत. त्यात  कैलाश टेकडी, खदान अकोला व तथागत नगर शिवणी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

16 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून सहा जण व हॉटेल रिजेन्सी येथून दोन जणांना अशा एकूण 16 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान काल रात्री एकाचा मृत्यू झाला. त्यात 60 वर्षीय पुरुष असून ते अकोली जहागीर, ता. अकोट येथील रहिवासी आहे. त्यांना दि. 20 जुलै रोजी दाखल झाले होते. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.

404 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 2579(2261+318) आहे. त्यातील  जण 105 मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  2070 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 404 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा